Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडी विरोधात 'या' कारणामुळे सुप्रीम कोर्टात धाव

महाविकास आघाडी विरोधात ‘या’ कारणामुळे सुप्रीम कोर्टात धाव

The reason why petition is filed in supreme court against  Mahavikasaghadi
दिल्ली : शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे तीन पक्ष राज्यात सत्तास्थापनेसाठी एकत्र आले आहेत. ही महाविकास आघाडी आज किंवा उद्या सत्तास्थानेचा दावा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या महाआघाडीला सत्तास्थापन करण्याचे निमंत्रण देऊ नये अशा प्रकारची याचिका  एस. आय. सिंह या व्यक्तीने सुप्रीम कोर्टात दाखल केली.

एस. आय. सिंह या व्यक्तीने सुप्रीम कोर्टात याचिकेत सांगितले की, सुप्रीम कोर्टाने राज्यपालांना असे आदेश द्यावेत की जनमताविरोधात एकत्र आलेल्या या आघाडीचे सरकार स्थापन करण्यास त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला निमंत्रण देऊ नये. या पूर्वी औरंगाबादेत एका वकिलाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे सरकार स्थापनेपूर्वीच महाविकास आघाडीच्या विरोधात तक्रारी सुरु झाल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments