Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यकर्त्यांना राहुल गांधींची भीती वाटू लागली- शरद पवार

राज्यकर्त्यांना राहुल गांधींची भीती वाटू लागली- शरद पवार

महत्वाचे…
१. राजीव गांधी यांच्या काळातील बंद झालेल्या प्रकरणांच्या फाईली पुन्हा उकरून काढून त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न २. इंदिरा गांधी यांना तुरुंगात टाकल्यानंतर ६ महिन्यात त्यांना जनतेने पुन्हा निवडून दिले होते ३.हाताला काम दिलं नाही तर या जिल्ह्यातील लोक अतिरेकी कार्याकडे (नक्षलवादाकडे) कसे वळतात


चंद्रपूर : राजीव गांधी यांच्या काळातील बंद झालेल्या प्रकरणांच्या फाईली पुन्हा उकरून काढून त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न आताचे राज्यकर्ते करीत आहेत. आता यांना राहुल गांधींची भीती वाटू लागली. त्यामुळेच जुनी प्रकरण उकरून गांधी कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कांग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. 

विदर्भ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पवार चंद्रपुरात होते. न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले,  दिलेली कर्जमाफी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आदर होता. त्याच श्रेय आमचे नाही. सत्तेचा गैरवापर आता सुरू आहे. आकसाचे राजकारण सुरू आहे. हे राज्य सरकार शेतकऱ्यांना न्याय देईल असे वाटत नाही. सुडाचे राजकारण सुरू केले. इंदिरा गांधी यांना तुरुंगात टाकल्यानंतर ६ महिन्यात त्यांना जनतेने पुन्हा निवडून दिले होते. हा इतिहास नरेंद्र मोदी विसरले आहेत. दारूबंदी असूनही चंद्रपूर येथे मोठी दारू विक्री. बंदी करायची होती तर ठोस कायदे निर्माण करून केली असती तर काही फायदा झाला असता. मात्र या राज्यकर्त्यांनी या बंदीच्या निमित्तानं भ्रष्टयाचाराला वाढवले.”

दरम्यान, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील लोकांचे आर्थिक प्रश्न राज्यकर्त्यांनी सोडवले नाही आणि हाताला काम दिलं नाही तर या जिल्ह्यातील लोक अतिरेकी कार्याकडे (नक्षलवादाकडे) कसे वळतात, हे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी हे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर असले पाहिजे. दुर्दैवानं तसं चित्र दिसत नाही असा हल्ला शरद पवार यांनी राज्यसरकारवर चढविला. विविध संघटनांनी पवार यांची भेट घेतली असता ते बोलत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments