Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeविदर्भनागपूरही 'हल्लाबोल' नाही तर 'डल्लामार' यात्रा-मुख्यमंत्री

ही ‘हल्लाबोल’ नाही तर ‘डल्लामार’ यात्रा-मुख्यमंत्री

नागपूर: विदर्भात विरोधकांनी काढलेली यात्रा ही  विरोधकांची यात्रा हल्लाबोल नव्हे तर डल्ला मार यात्रा होती अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. चहापानाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.

विरोधक अजूनही तीन वर्षांपूर्वीच्या सैराट सिनेमावरच अडकलेत. त्यांना नव्या सिनेमांची नावं सांगा असा टोलाही त्यांनी लगावला. विरोधकांमधील नेत्यांचा फरार नेते असाही उल्लेख केला. दुसरीकडं आतापर्यंत ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. यातल्या २१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी तर १२ लाख शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाल्याचीही त्यांनी माहिती दिली. १९ विधेयकं अधिवेशनाच्या पटलावर मांडणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसंच नाना पटोले यांना त्यांची चूक कळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय. सत्ताधाऱ्यांच्या या चहापानाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री आणि नेतेही उपस्थित आहेत. शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे मंत्री चहापानाला उपस्थित असून भाजप शिवसेनेत खेळीमेळीचं वातावरण असल्याचं दिसतंय.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

विरोधकांची टेप सैराटवरच अडकलेली

राज्यात धान्यांचं उत्पादन वाढलं

कापूस उत्पादन वाढले

बीटी कंपन्यांकडून नुकसान भरपाई वसूल करणार

विम्याच्या माध्यमातून बोंडअळीग्रस्तांना मदत

धान उत्पादक शेतकऱ्यांनाही मदत देणार

कीटकनाशकांची बाधा होऊ नये म्हणून उपाययोजना

शेतकरी कर्जमाफीसाठी ७७ लाख अर्ज

४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

२१ लाख ४६ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

१२ लाख शेतकऱ्यांना अनुदान

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments