Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्र'वन अबव्ह'च्या २ व्यवस्थापकांना अटक

‘वन अबव्ह’च्या २ व्यवस्थापकांना अटक

मुंबई – कमला मिल मधल्या दुर्घटनेप्रकरणी ” वन अबव्ह‘ या हॉटेल मालकांच्या नातेवाईकांना जामीन मिळाल्यानंतर या हॉटेलच्या २ व्यवस्थापकांना आज मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. केविन बावा आणि लिस्बन लोपेज अशी अटक करण्यात आलेल्या त्या व्यवस्थापकांची नावे आहेत.

कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाउस या इमारतीमधील मोजोस बिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत १४ जणांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस आणि मुंबई महापालिकेने हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईचा आणि या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याच परिसरातील वरळीच्या रघुवंशी मिल कंपाऊंडमधील पनाया आणि शिसा स्काय लाऊंज या हॉटेलमधल्या अनधिकृत शेडस पाडण्यात आल्या आहेत. आज दिवसभर ही अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू राहणार आहे. तसेच महापालिकेने तडकाफडकी ५ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments