मुंबईच्या हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे-ममता बॅनर्जी भेट!

- Advertisement -

मुंबई – केंद्रातील मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीयांची आज भेट झाली. दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही भेट झाली. या भेटीचे फोटो समोर आले आहेत. या भेटीदरम्यान उद्धव यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील दिसत आहेत.

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पण ही भेट केवळ सदिच्छा भेट होती असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती, त्यावेळी शिवसेनेने त्यांचं समर्थन केलं होतं. जर पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊ शकतात तर आम्ही ममता बॅनर्जींसोबत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात काहीच गैर नाही असं उद्धव गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये म्हणाले होते. त्यामुळे या भेटीने विविध राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

- Advertisement -