Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रअभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचा सोमवारी शिवसेनेत प्रवेश?

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचा सोमवारी शिवसेनेत प्रवेश?

मुंबई l लोकसभेच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाच्या सदस्यात्वाचा राजीनामा देत राजकारणापासून दूर गेलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. परंतु त्या आता राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेनेपासून करणार आहेत. सोमवारी त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार १२ नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली.

वाचा l ‘कुली नं. १’ गोविंदा की वरुण?पाहा ट्रेलर

यांपैकी एका जागेसाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून उर्मिला मातोंडकर यांची निवड करण्यात आल्याचं समोर आलं होतं. काँग्रेसकडून सचिन सावंत, रजनी पाटील, मुजफ्फर हुसैन, अनिरुद्ध वणगे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांची शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

वाचा l भाजपच्या माजी मंत्र्याची पोलीस अधिका-यांना धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल

उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. दरम्यान, राजकारणातून दूर राहिल्यानंतर वर्षभरानंतर त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments