ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड

- Advertisement -

मुंबई l मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं आज रविवार ६ डिसेंबर वृद्धापकाळाने निधन झाले. सिनेसृष्टीत आपल्या भारदस्त व्यक्तीमत्वाचा दरारा असणाऱ्या रवी पटवर्धन यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कलेची उपासना केली.

गेल्या काही दिवसांपर्यंत ते मनोरंजन क्षेत्रात सक्रीय होते. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर आज पहाटे त्यांनी आपल्या ठाण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.

रवी पटवर्धन यांनी मराठी चित्रपटांसह शेकडो नाटकांमधून देखील काम केलं होतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते कला क्षेत्रात कार्यरत होते. छोट्या पडद्यावरील अग्गंबाई सासूबाई या झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेत त्यांनी बबड्याच्या आजोबाची भूमिका केली होती.

- Advertisement -

६ सप्टेंबर १९३७ साली पवी पटवर्धन यांचा जन्म झाला होता. अनेक मराठी सिनेमांमध्ये त्यांनी ग्रामीण भागातील व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. त्यांच्या भारदस्त व्यक्तीमत्वाला साजेशा अनेक व्यक्तीरेखा त्यांनी पडद्यावर साकारल्या होत्या. याशिवाय त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केलं होतं. अनेकदा त्यांनी खलनायकाची भूमिका देखील साकारल्या होत्या.

- Advertisement -