Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeविदर्भगोंदियाग्रामीण रुग्णालय सडक/अर्जुनी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते सीबी-नॅट मशिनचे लोकार्पण

ग्रामीण रुग्णालय सडक/अर्जुनी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते सीबी-नॅट मशिनचे लोकार्पण

गोंदिया : सडक/अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्‍या हस्ते आज 30 जुलै रोजी अचुक क्षयरोग निदान करणाऱ्या आधुनिक सीबी-नॅट मशिनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, नगराध्यक्ष देवचंद तरोणे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद यांची प्रमुख उपस्थिती होती.

सेंट्रल टीबी डिव्हिजन, आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आणि आशाकल्प हेल्थ केअर असोशिएशन संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त वतीने गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल व अतिदुर्गम अशा देवरी, सालेकसा, सडक/अर्जुनी व अर्जुनी/मोरगाव तसेच लगतच्या भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यातील नागरिकांना क्षयमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सडक/अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात अंदाजे ३० लक्ष रुपये किंमतीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या सीबी-नॅट मशिन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यामुळे जनतेचे क्षयरोग निदान व उपचार करणे सोईचे होणार आहे. क्षयमुक्त भारत अभियानाकडे एक पाऊल पुढे जावून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments