नागपूर बलात्कार : हैदराबादप्रमाणे आरोपीचा एन्काऊंटर करा

- Advertisement -
Image: ABP

नागपूर कळमेश्वरजवळ लिंगा गावात 5 वर्षीय चिमुरडीच्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर आज नागरिकांनी कळमेश्वर बंद पुकारला आहे. चिमुरडीला न्याय मिळावा या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. कळमेश्वरमध्ये सर्व दुकान बंद करण्यात आली आहे. आरोपी संजय पुरीला आमच्या ताब्यात द्या. फाशी किंवा त्याचा हैदराबादप्रमाणे एन्काऊंटर करा, अशी संतप्त मागणी गावकऱ्यांणी केली आहे.

संतप्त नागरिकांनी आंदोलन करत गावात कडकडीत बंद पुकारला आहे. दरम्यान, कळमेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहे. तेथील नागरिकांशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया चिमुकलीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

कळमेश्वर तालुक्यातील लींगा येथे 6 वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी लिंगा गावाशेजारी असलेल्या शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला. कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -