Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeविदर्भवर्धाप्रशांत भूषण म्हणाले, केंद्र सरकार आर्मीही विकायला काढेल

प्रशांत भूषण म्हणाले, केंद्र सरकार आर्मीही विकायला काढेल

Prashant Bhushanवर्धा : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, कधी बँका तर कधी रेल्वे विकण्याचा घाट हे घालत आहेत. उद्या देशाची आर्मीही विकायला काढतील, असा खळबजनक आरोप सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण यांनी केला.

प्रशांत भूषण वर्ध्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांना हटवून उर्जित पटेल यांना आणलं. सरकारने केलेली नोटबंदी त्यांनी चूपचाप सहन केली. सरकारनं रिझर्व्ह बँकेकडे जमा असलेल्या रकमेची मागणी केली. पटेल यांनी त्यास नकार दिल्यानंतर त्यांनाही हटविण्यात आलं. त्यांच्याजागेवर अर्थशास्राशी संबंध नसलेल्या इतिहास विषयात पदवीधर असलेल्या गव्हर्नरची नियुक्ती केली. नामधारी नियुक्त्या करून सरकार सर्वच क्षेत्रात पाय पसरत आहे. बँकेतील पैसा काढून कार्पोरेट क्षेत्राला दिला जात असल्याचा गंभीर आरोप, प्रशांत भूषण यांनी केला.

प्रशांत भूषण यांनी यावेळी राफेल विमान खरेदी प्रकरणावरुनही सरकारवर टीकास्त्र सोडलं. सरकार कॅगचा रिपोर्ट येण्यापूर्वीच न्यायालयात रिपोर्ट सादर करते. त्यानंतर सरकारला पाहिजे तसा रिपोर्ट सादर केला जातो. प्रथमच संरक्षण क्षेत्रातील सौद्यातून किमतीचा तपशील हटवला गेल्याचा आरोपही प्रशांत भूषण यांनी यावेळी केला. सरकार सर्व क्षेत्रात अपयशी असल्याची टीका केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments