Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रविधानपरिषद निवडणूक: लातूर राष्ट्रवादीला, परभणी काँग्रेसला

विधानपरिषद निवडणूक: लातूर राष्ट्रवादीला, परभणी काँग्रेसला

Cognress, NCPमुंबईस्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडल्या जाणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी, अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीचं घोडं गंगेत न्हालं आहे. दोन्ही पक्षांनी आघाडी करण्याचं निश्चित केलं आहे. ज्या उस्मानाबाद-बीड-लातूरच्या जागेवरुन आघाडी अडली होती, ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडली आहे. त्याबदल्यात परभणीची जागा काँग्रेसला मिळाली आहे.

आता उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघात भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले रमेश कराड हे आघाडीचे उमेदवार असतील. नव्या समीकरणानुसार कोकण, नाशिक आणि लातूर या तीन जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत, तर अमरावती, चंद्रपूर आणि परभणी या जागांवर काँग्रेस उमेदवार असणार आहेत.

आघाडीचे उमेदवार…
१. उस्मानाबाद-बीड-लातूर – रमेश कराड (राष्ट्रवादी)

२. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)

३. नाशिक – शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)

४. वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली  –

५. परभणी-हिंगोली –

६. अमरावती –

विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे उमेदवार….
१. विपुल बजोरिया – हिंगोली-परभणी

२. नरेंद्र दराडे – नाशिक

३. राजीव साबळे- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

२१ मे रोजी मतदान, २४ मे रोजी निकाल….
स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३ मे अंतिम तारीख आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments