आमच्याकडे बहुमत,आम्ही विधानपरिषदेची निवडणूक लढवणारच-अशोक चव्हाण

- Advertisement -

मुंबई: आमच्याकडे बहुमत आहे आम्ही विधानपरिषदेची निवडणूक लढवणारच आहोत. अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नारायण राणे यांनी त्यांच्या विधानपरिषदेचा राजीनामा देऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. राणे यांच्या राजीनाम्यामुळे विधानपरिषदेची जागा रिक्त आहे. राणे यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करुन भाजपला समर्थन दिलेले आहे. राणे यांना उमेदवारी देऊन भाजपा मदत करेल परंतु त्यांच्याकडे १४५ चा आकडा नसल्यामुळे राणे यांच्यासाठी ती लढाई सोपी नाही. राणेंना उमेवारी दिली तर शिवसेना हे राणे यांच्या विरोधात मतदान करतील. भाजपाने आपले पत्ते उघडले नाही. काँग्रेसने आपली भूमिका स्षष्ट केली आहे. यामुळे भाजपाने राणे यांना उमेदवारी दिली तर काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना एकत्र येऊन राणे यांचा पराभव करु शकतात अशी चर्चा सध्या सुरु आहे.

- Advertisement -