मराठी गझलचे तळहात उसवले, प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं निधन

- Advertisement -

सांगली: प्रसिद्ध गझलकार आणि ज्येष्ठ साहित्यिक इलाही जमादार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास घेतला. सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या जाण्याने गझल विश्वात शोककळा पसरली आहे.

‘आत्म्याचा सौदा करूनी जर स्वतःस विकले असते, एकेक वीट सोन्याची घर असे बांधले असते,’ असं म्हणत मानवी जीवनातील दुःख, वेदना शब्दबद्ध करणारे आणि आपल्या लेखणीनं मराठीतील गझलविश्व समृद्ध करणारे गझलकार इलाही जमादार यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ रोजी झाला सांगलीतील दुधगाव येथे झाला होता. जमादार यांनी १९६४ पासून काव्यलेखन सुरू केलं. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी कार्यक्रम केले. मराठी, हिंदी, उर्दू आदी दैनिकं आणि मासिकांसाठी इलाही जमादार यांनी कविता व गझल लिहिल्या.

- Advertisement -

मराठी, हिंदी, उर्दू दैनिक आणि मासिकांतून इलाहींच्या कविता आणि गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळा घ्यायचे. नवोदित कवींसाठी इलाही गझल क्लिनिक नावाची गझल कार्यशाळाही घ्यायचे.

सुरेश भट यांच्यानंतर इलाहींनी मराठी गझलेला उत्तुंगतेच्या शिखरावर नेलं. जुलै २०२० मध्ये ते तोल जाऊन पडले होते. यावेळी त्यांना जबर मार लागला होता. त्यातच वाढत्या वयामुळे त्यांना स्मृतिभ्रंशाचा त्रासही सुरू झाला होता.

इलाही जमादार यांनी अनेक कविसंमेलने आणि मुशायरे यात भाग घेतला आहे. इलाही जमादार यांचे महाराष्ट्रतील अनेक शहरांत आणि महाराष्ट्राबाहेरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे आणि मराठी गझलांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम होत असत. इलाही यांनी ‘जखमा अशा सुगंधी’ आणि ‘महफिल-ए-इलाही’ या नावांनी मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले आहेत.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here