Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रइंजिनियर तरुणाची डोक्यात पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या!

इंजिनियर तरुणाची डोक्यात पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या!

Computer Engineer Suicides

महत्वाचे

  • एक वर्षाभरापूर्वी पत्नीला घटस्फोट दिला होता
  • वडिलांच्या पिस्तूलने केली आत्महत्या
  • बाथरुमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

पिंपरी-चिंचवड: वाकड येथील इंजिनियर तरुणाने वडिलांच्या पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सकाळी ६ च्या सुमारास घडली. आनंद यादव वय-३५ असं आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे.

मयत आनंद याने काही महिन्यांपूर्वी डिप्रेशन थेरेपी घेतली होती. त्यानंतर आज आनंद याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहिली असून माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही असं नमूद केलेलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड मधील रिदम या सोसायटीमध्ये इंजिनियर आनंद यादव वय-३५ यांनी डोक्यात पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना सकाळी सहाच्या सुमारास घडली.  गोळी झाडली तेव्हा वहिनीला आवाज आला परंतु काही वेगळं असावं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं.  त्यानंतर सकाळी आठ वाजता आनंदला उठवण्यास गेले तेव्हा हा प्रकार समोर आला आहे. आनंद यादव याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बाथरूम मध्ये पडलेला होता. गेल्या सहा महिन्यापासून मयत आनंद हा त्याचा छोटा भाऊ आणि वहिनीसोबत रिदम या सोसायटीत राहात होता. हे कुटुंब मूळ ठाण्याचे आहे ते २०१५ पासून वाकड मध्ये वास्तव्यास आहेत. तर वडील हे मोठे व्यवसायिक आहेत.रात्री उशिरा वडील ठाण्यावरून वाकड येथे आले होते. त्यांनी त्यांच्या सोबत परवाना असलेली पिस्तुल आणली होती. याच पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून आनंद ने आत्महत्या केली. विशेष म्हणजे आनंदने काही महिन्यांपूर्वी डिप्रेशन थेरपी घेतली होती. त्यानंतर आज सकाळी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे.

………………………….

ठाण्याचे कुटुंब वाकड मध्ये राहत होते….

कुटुंब मूळ ठाण्याचे आहे ते २०१५ पासून वाकड मध्ये वास्तव्यास आहेत. तर वडील हे मोठे व्यवसायिक आहेत.रात्री उशिरा वडील ठाण्यावरून वाकड येथे आले होते. त्यांनी त्यांच्या सोबत परवाना असलेली पिस्तुल आणली होती. याच पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून आनंद ने आत्महत्या केली.

………………………….

एका वर्षापूर्वी दिला होता पत्नीला घटस्फोट

आनंद याचा विवाह झाला होता परंतु पत्नीचे आणि त्याचे नेहमी किरकोळ कारणावरून खटके उडायचे यामुळे काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता. ताणतणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments