Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेपुण्यात पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी चक्क झाडांची कत्तल

पुण्यात पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी चक्क झाडांची कत्तल

पुणे : आरे जंगलातील झाडांच्या कत्तलींचं प्रकरण गाजत असतांना, पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेसाठी झाडांची कत्तल करण्यात आली. यामुळे वृक्षप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींच्या सभेचं गुरुवारी पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी एसपी कॉलेजच्या कॉलेजच्या परिसरातील झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. परिसरातील अनेक मोठी झाडे सोमवारी रात्री कापण्यात आली आहेत. सभेत अडथळा ठरणारी सर्व झाडे कापण्यात आली असून जमिनीचं सपाटीकरण करण्यात आलं आहे.

एसपी कॉलेजच्या मैदानात व्यासपीठ उभारण्याचं काम सुरु आहे. यावेळी अडथळा ठरणारी जवळपास 25 झाडे कापण्यात आली आहेत.यामुळे नगरिकांनी नाराजी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments