महाविकास आघाडीकडून सांगली महापौर निवडणुकीत भाजपाचा गेम

भाजपने हातातील सत्ता गमावली

- Advertisement -
sangli-mayor-election-mahavikas-ncp-congress-aghadi-bjp
sangli-mayor-election-mahavikas-ncp-congress-aghadi-bjp

सांगली:  सांगली महापौर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. बहुमत असलेल्या महापालिकेत महापौर निवडीवेळी पक्ष शाबूत ठेवण्याबरोबरच बंडखोरी टाळण्याचं आव्हान पेलण्यात भाजपाला अपयश आलं आहे. सांगली पालिकेत महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या उमेदवाराची निवड झाली आहे. सत्ताधारी भाजपाला पालिकेत बंडखोरीचा मोठा फटका बसला असून हातातील सत्ता गमावली आहे.

सत्ताधारी भाजपची पाच मतं फुटली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी यांची महापौरपदी निवड झाली आहे. महापौर निवडीवेळी भाजपाचे दोन सदस्य गैरहजर होते. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील विजयी झाले आहेत.

वाचा: वनमंत्री संजय राठोडांनी पूजा चव्हाण प्रकरणावर सोडलं मौन;म्हणाले…

- Advertisement -

महापालिकेत भाजपाचे संख्याबळ पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ४१ आणि समर्थन दिलेले दोन अपक्ष असं एकूण ४३ आहे. माजी महापौर हारूण शिकलगार यांचे अकाली निधन झाल्याने काँग्रेसचे १९, तर राष्ट्रवादीचे १५ सदस्य आहेत. बहुमतासाठी ३९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक होता.

तटस्थ -२
दिग्विजय सूर्यवंशी – ३९
धीरज सूर्यवंशी – ३६
(१ सदस्य निधन)
एकूण संख्याबळ – ७८

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here