Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रसाताराआप्पासाहेब पाटील ASMNI संघटनेचे तिस-यांदा प्रदेशाध्यक्ष

आप्पासाहेब पाटील ASMNI संघटनेचे तिस-यांदा प्रदेशाध्यक्ष

कराड – असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी आप्पासाहेब पाटील यांची तिस-यांदा फेर नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य  केशवदत्त चंदोला यांनी नुकत्याच गोपाळपूर, ओरिसा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय वार्षिक अधिवेशनाच्या वेळी ही निवड करून महाराष्ट्र राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचनालयाचे महासंचालक यांना लेखी पत्राद्वारे नियुक्ती केल्याचे कळविले आहे आणि आता महाराष्ट्र राज्यातील सर्व म्हणजे राज्य, विभाग आणि जिल्हा स्तरावरील कार्यकारणींची निवड करण्याचे अधिकारही राष्ट्रीय अध्यक्षांनी राज्य अध्यक्ष श्री. आप्पासाहेब पाटील यांना नुकतेच लेखी पत्राद्वारे प्रदान केले आहेत.

संघटनेच्या द्विवार्षिक कार्यकारणींची मुदत डिसेंबर २०१८ अखेर संपली होती तथापि त्यास राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संमतीने राष्ट्रीय अध्यक्षांनी मुदतवाढ दिली होती आता नव्या राज्य कार्यकारिणींची निवड करण्यात येणार असल्याचे आप्पासाहेब पाटील यांनी सांगितले. राज्य संघटनेच्या पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष श्री. चंदोला यांची कानपूर मुक्कामी भेट घेऊन संघटनात्मक चर्चा केली. त्यावेळी राज्य अध्यक्ष श्री. आप्पासाहेब  पाटील यांनी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य पातळीवरील उपक्रमांची माहिती दिली. या शिष्टमंडळात राज्य संघटक सचिव गोरख तावरे, कराड (सातारा), राज्य उपाध्यक्ष प्रविण पाटील, कोडोली (कोल्हापूर), राज्य संघटन सचिव नेताजी मेश्राम, ब्रह्मपूर (चंद्रपूर) यांचा समावेश होता. यावेळी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य व उत्तर प्रदेशचे अध्यक्ष शाम सिंह पवार, कानपूर, भारतीय स्वरूप चे संपादक अतुल दीक्षित (कानपूर), कर्म कसोटीचे संपादक डी. के. मैथानी (कानपूर), कानपूर प्रेस क्लबचे चन्दन जायसवाल (कानपूर) यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष श्री चंदोला यांच्या हस्ते संघटनेच्या पदाधिका-यांना ओळखपत्रे प्रदान करण्यात आली. असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया या संघटनेची राज्यात चांगली बांधणी झालेली असून बहुसंख्य जिल्ह्यात सभासद नोंदणी सुरू आहे. राज्यात सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अखंडपणे प्रकाशित होणारे, आरएनआय च्या नोंदणी क्रमांक प्राप्त असलेले आणि आरएनआयकडे वार्षिक विवरणपत्र नियमितपणे सादर करणारे कोणतेही दैनिक, साप्ताहिक, मासिक, वार्षिक, नियत कालिके इत्यादी या संघटनेचे सभासद होऊ शकतात. ही सभासद नोंदणी दरवर्षी ०१ जानेवरी ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी केली जाते. असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया ही राष्ट्रीय पातळीवर २५ राज्यात कार्यरत असून महाराष्ट्रातही संघटनेच्या ध्येय धोरणानुसार उत्तम प्रकारे कार्य सुरू आहे.

शासनमान्य यादीवर येणे, अधिस्वीकृतीपत्रिका मिळवणे, आरएनआय प्रश्न, डीएव्हीपी प्रश्न, पोस्ट खात्याचे प्रश्न, अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेकरीता मार्गदर्शन आणि प्रसार धोरण २०१८ मधील जाचक अटी दुरूस्तीसाठी तसेच महाराष्ट्र राज्य शासनाकडे प्रलंबित असणारे अनेक प्रश्न त्याचप्रमाणे नव्या संदेश प्रसार धोरणातील जाचक अटी आणि नियम बदलण्याच्या अनुषंगाने सातत्याने संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील बहुसंख्य सदस्य या संघटनेशी एकरूप झाले आहेत. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न व जाहीरात वितरण धोरण दुरूस्ती याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष श्री. चंदोला यांच्या नेतृत्वाखाली  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, माहिती खात्याचे सचिव तथा महासंचालक, संचालक प्रशासन, संचालक वृत्त व संचालक विशेष कार्यभार यांच्या अनेकवेळा भेटी घेऊन त्यांच्या बरोबर सविस्तर चर्चा करून प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

जाहीरात प्रसार धोरण २०१८ चा जी.आर. निघण्यापूर्वी कच्चा मसूदा सर्वांसाठी शासनामार्फत हरकती व सूचनेसाठी खुला करण्यात आला, त्याचे सर्व श्रेय राष्ट्रीय अध्यक्ष  चंदोला यांच्याकडे जाते. राष्ट्रीय अध्यक्ष चंदोला यांनी प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर सर्वांना सामावून घेऊन न्याय देण्याच्या दृष्टीने व्हावा अशी भूमिका संघटनेचे राज्य अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी घेतली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments