Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रसोलापूरजलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने तरूणाला चिरडले

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने तरूणाला चिरडले

Tanaji Sawant Accident,Solapur,Tanaji Sawant,Tanaji,Sawant,Accident
Image: esakal

सोलापूर: जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने तरूणाला चिरडले. यामध्ये दुचाकीस्वार चालक तरूण जागीच ठार झाला. अपघातानंतर गाडीचा चालक पसार झाला. संतप्त जमावाने स्कॉरपिओची तोडफोड करण्यात आली. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आज सकाळी घडली.

भाजी विक्रेता दुचाकीवर जात होता. त्याचवेळी तानाजी सावंत यांच्या भरधाव गाडीने तरुणाला चिरडले. यामध्ये तरुण जागीच ठार झाला. त्यावेळी चालकाने गाडीच्या नंबर प्लेट काढून तेथून पळ काढला. मात्र, त्यानंतर संतप्त जमावाने गाडीची तोडफोड केली. विशेष म्हणजे गाडीमध्ये तानाजी सावंत यांच्यानावाने कागदपत्रे होती.

तानाजी सावंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मी मुंबईत आहे. मला काहीही माहिती नाही अशी माहिती त्यांनी दिली. अपघातास्थळी पोलीस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments