अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियाही करतोय डेब्यू…पण बॉलिवूडमध्ये नाही तर…!

- Advertisement -

अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटिया हा सुद्धा डेब्यू करतोय. अर्थात आरवचा डेब्यू कुठल्या बॉलिवूडशी संबंधित नाही तर आरव सगळ्यांपेक्षा वेगळेच करण्याच्या मूडमध्ये आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सच्या डेब्यूची चलती आहे. नुकतीच श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर हिच्या बॉलिवूड डेब्यूची घोषणा झाली. सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान हिच्या डेब्यू सिनेमाचेही शूटींग सुरु झालेयं. शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर याचाही डेब्यूही ठरलायं. याशिवाय अनेक स्टार किड्स बॉलिवूड डेब्यूच्या वाटेवर आहेत. शाहरूख खानची मुलगी सुहाना खान व मुलगा आर्यन खान अशा काही स्टार किड्सच्या बॉलिवूड डेब्यूची जोरदार चर्चा आहे.  या स्टारकिड्सप्रमाणेच आता अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटिया हा सुद्धा डेब्यू करतोय. अर्थात आरवचा डेब्यू कुठल्या बॉलिवूडशी संबंधित नाही तर आरव सगळ्यांपेक्षा वेगळेच करण्याच्या मूडमध्ये आहे. होय, तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, असे काही आरव करणार आहे. काय? तर आरव लेखक बनणार आहे. 

होय, आई  ट्विंकल खन्ना हिच्या पावलावर पाऊल टाकत आरवने हातात लेखणी घेतली आहे. आरव लवकरच एक यंग अ‍ॅडल्ट नॉवेल लिहिणार आहे. या नॉवेलबद्दल आणखी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. पण वडिल अक्षयसारखे गुड लुक्स आणि आई  ट्विंकल खन्ना हिच्यातील साहित्यिकाचे गुण आरवमध्ये पुरेपूर उरलेले आहेत. त्यामुळे आरवचा हा डेब्यू चांगलाच इंटरेस्टिंग असणार यात काहीही शंका नाही. आरवच्या या पुस्तकाची आम्हाला प्रतीक्षा असेल.
आरव कायम आपल्या मित्रांसोबत दिसतो. मीडियासमोर येताच आरव आपला चेहरा लपवताना दिसतो. कदाचित आरव स्वभावाने काहीसा लाजरा आहे. पण मम्मा  ट्विंकल खन्नाचे मानाल तर, आरवचा सेन्स आॅफ ह्युमर खूप चांगला आहे. कदाचित म्हणूनच आरवने इतक्या लहान वयात पुस्तक लिहायला  घेतले आहे. अक्षय कुमारप्रमाणेच आरव सुद्धा मार्शल आर्ट शिकला आहे. खरे तर अक्षयप्रमाणेच आरवलाही मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सूक आहेत. पण आता आरवने वेगळीच वाट निवडलीयं म्हटल्यावर त्याला शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात ना.

- Advertisement -
- Advertisement -