अर्जुन कपूरच्या ‘संदीप और पिंकी फरार’चे फर्स्ट लूक!

- Advertisement -

यंदा ‘मुबारकां’ व ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ सारखे सिनेमे देणारा अभिनेता अर्जुन कपूर सध्या आपल्या नव्या चित्रपटात बिझी आहे. ‘संदीप और पिंकी फरार’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. काही क्षणांपूर्वी अर्जुनने ‘संदीप और पिंकी फरार’चे फर्स्ट लूक जारी केले.  लहान केस आणि मिशी अशा आत्तापर्यंत कधी न पाहिलेल्या अवतारात अर्जुन यात दिसतोय.

दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथेबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. कारण अद्याप हा चित्रपट कशावर बेतलेला आहे, याबद्दल कुणालाही काहीही ठाऊक नाही. चित्रपटाच्या कथेशिवाय यातील कलाकारांच्या लूक्सबद्दलही उत्सुकता दिसून येतेय. अर्जुनचा लूक तर आपण पाहिला. पण आता परिणीतीचा लूक कसा असेल, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. कारण सूत्रांचे मानाल तर अर्जुन व परिणीती दोघेही या चित्रपटात परंपरागत बॉलिवूड स्टाईलमध्ये दिसणार आहेत.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना अर्जुन कपूरने या चित्रपटाबद्दल एक हिंट दिली होती. ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट भारत विरूद्ध इंडियाच्या कल्पनेवर आधारित असल्याचे त्याने सांगितले होते. गेल्या काही काळात आपला देश भारत विरूद्ध इंडिया अशा वेगळ्यात गुंत्यात फसलेला दिसतोय. दोन वेगवेगळ्या विचारधारांचा संघर्ष देशात पाहायला मिळतो आहे. ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट याच विचारधारेवर बेतलेला असेल. समाजातील बदल लोकांच्या आयुष्यात कशी उलथापालथ घडवू शकतात, हे या चित्रपटात दिसेल, असे त्याने सांगितले होते. अर्जुनच्या या हिंटवरून चित्रपटाच्या कथेबद्दल कयास बांधता येणे कठीण आहे. पण अर्जुनचा फर्स्ट लूक इंटरेस्टिंग वाटतोय. तशीच चित्रपटाची कथाही इंटरेस्टिंग असेल, अशी आशा करूयात. तोपर्यंत अर्जुनचा हा लूक तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला सांगायला विसरू नका. या चित्रपटाचे शूटींग उत्तर भारतात होणार आहे. दोन महिने हे शूटींग चालणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -