‘अवाम की जान’ अर्शी खानला लागली लॉटरी!

- Advertisement -

‘बिग बॉस’च्या घरात ‘मोस्ट एंटरटेनिंग कंटेस्टंट’ म्हणून प्रसिद्ध झालेली ‘आवाम की जान’ अर्शी खान हिच्या नशीबाची कवाडे कदाचित उघडली आहेत. होय, अर्शी खानच्या हाती एक मोठा चित्रपट लागलाय. तोही ‘बाहुबली’ प्रभासचा. होय, खुद्द अर्शी खानने ही माहिती दिली आहे. अर्शीने एक  tweet करून सलमान खान, बिग बॉस आणि कलर चॅनलचे आभार मानले आहेत. अलीकडे एका मुलाखतीत, साऊथच्या चित्रपटात काम करायला मला आवडेल, असे अर्शी खान म्हणाली होती. कदाचित तिची ही इच्छा लगेच पूर्ण झालीय.  #ArshiKhan signed on for a big film in main lead starring mega star Prabhas. Thank you @BeingSalmanKhan @ColorsTV @EndemolShineIND @BiggBoss @rajcheerfull #AbhishekRege Special thanks to #NevadaPutmanअसे tweetअर्शीने केले आहे. पण अद्याप अर्शीच्या या चित्रपटाचे नाव काय, त्यात तिची भूमिका काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चर्चा खरी मानाल तर लवकरच अर्शी एका रिअ‍ॅलिटी शोमध्येही दिसणार आहे. ‘बिग बॉस’मध्ये मजेशीर अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यावर ती नव नव्या आव्हानांशी लढताना दिसेल. होय, अर्शी लवकरच ‘खतरों के खिलाडी’च्या नवव्या सीझनमध्ये दिसू शकते, असे कळतेय. अर्शी कॉमन मॅन बनून ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचली होती. सध्या अर्शी आपल्या फिटनेसवर सर्वाधिक लक्ष देत आहे. जिममध्ये ती तासन तास घाम गाळत आहे. आता ही तयारी तिच्या चित्रपटासाठी आहे की ‘खतरों के खिलाडी’च्या सीझन ९ साठी आहे, हे तिलाच ठाऊक़.

- Advertisement -