जरीन खानने म्हटले, ‘जर सलमान नसता तर मी…?’

- Advertisement -

पदार्पणातच बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेल्या अभिनेत्री जरीन खानचे फिल्मी करिअरमधल्या काळात चांगलेच अडखळीत सापडले होते. मोठ्या प्रयत्नानंतर तिने स्वत:चे करिअर सावरले असून, छोट्या मोठ्या भूमिका स्वीकारत ती बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु यावेळेसदेखील सलमान खाननेच मदतीचा हात पुढे केल्याचे तिचे म्हणणे आहे. होय, जरीन खानने कृतज्ञता दर्शविणारे एक वक्तव्य केले असून, त्यामध्ये ‘सलमान खान नसता तर कदाचित मी इंडस्ट्रीत नसती’ असे म्हटले आहे. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफसारख्या दिसणाºया जरीनने सलमानसोबत ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

जरीनने म्हटले की, सलमान असा व्यक्ती आहे, जो नेहमीच माझ्यासाठी प्रिय आणि खास राहिला आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनात एक वेगळीच भावना आहे. जर मी त्याच्यासोबत काम केले नसते तर कदाचित मी या इंडस्ट्रीचा भाग कधीच बनू शकली नसती. ज्यापद्धतीची मला सुरुवात मिळाली ती माझ्यासाठी स्वप्नवत होती, असेही जरीनने म्हटले.

- Advertisement -