शाहरूख खानच्या सुहानाचा नवा फोटो व्हायरल

- Advertisement -

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याची मुलगी सुहाना गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. याआधी ती शाहरूखसोबत एका शोरूमच्या उद्घाटनाला दिसली होती. तेव्हा तिने परिधान केलेल्या ड्रेसची जोरदार चर्चा रंगली होती.

आता तिचा एक नवा फोटो चर्चेत आला असून यात ती फारच सुंदर दिसत असल्याच्या प्रतिक्रिया मिळत आहे. सुहाना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. काहींनी तिला हॉट दिवा म्हटलंय तर काहींनी नेक्स्ट सुपरस्टार असं म्हटलंय. सुहाना ही सध्या शिक्षण घेत असून तिच्या बॉलिवूड एन्ट्रीच्या चर्चांनाही अनेक दिवसांपासून उधाण आले आहे.

- Advertisement -

याआधी सुहानाचा एक शाळेत अभिनय करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओतील तिच्या अभिनयाची अनेकांकडून प्रशंसाही करण्यात आली होती. आता हा फोटो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

- Advertisement -