सरफरोश’च्या सिक्वेलमध्ये काम करायला आवडेल : आमिर खान

- Advertisement -

मुंबई : सुपरस्टार आमिर खानने त्याचा सिनेमा ‘सरफोरश’च्या सिक्वेलमध्ये भूमिका साकरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मॅथन सिक्वेल बनवण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर आमिर खानला प्रश्न विचारण्यात आला होता.

१९९९ साली आलेल्या या सिनेमात आमिर खानने एका कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या सिनेमातील आमिर अर्थात एसीपी राठोड अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. १९ व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलसाठी हजेरी लावली असता आमिरला हा प्रश्न विचारण्यात आला. व्यस्त वेळापत्रकामुळे एकही सिनेमा पाहू शकत नसल्याचं त्याने सांगितलं. आगामी सिनेमा ‘सिक्रेट सुपरस्टार’मधील अभिनेत्री जायरा वसीमसह आमिरने यावेळी हजेरी लावली.

- Advertisement -