सलमान ने मागितली सर्व कुत्र्यांची माफी!

- Advertisement -

सलमान खानने जगातील सगळ्या कुत्र्यांची माफी मागितली आहे. होय, ‘पिछले हफ्ते मैंने कुत्ता शब्द का इस्तेमाल किया था. इसलिए मैं सभी कुत्तों से माफी मागना चाहता हूं.मैंने इस शब्द का इस्तेमाल किया. कुत्ते तो बहुत वफादार होते हैं. वे पूरी तरह अपने मालिक का साथ देते हैं’,असे सलमान म्हणाला. आता सलमानला अचानक कुत्र्यांची माफी का मागावीशी वाटली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आम्ही तुम्हाला आठवण करून देतो. सलमानने कुत्र्यांची माफी मागितली, पण त्याचा इशारा भलत्याकडेचं होता. होय, कुत्र्यांची माफी मागून सलमानने ‘इशारों इशारों’मध्ये कुण्या भलत्यालाच प्रतित्त्युर दिलेय. आता हा भलता कोण तर ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक जुबैर खान. होय, सलमानने नाव न घेता जुबैरला उत्तर दिले.

‘बिग बॉस’च्या चालू सीझनमध्ये जुबैर सहभागी झाला होता. पण पहिल्याच आठवड्यानंतर त्याची ‘बिग बॉस’च्या घरातून सुट्टी करण्यात आली. आता हा अख्खा जुबैर एपिसोड तर तुम्हाला ठाऊक आहेच. दोन आठवड्यांपूर्वी ‘बिग बॉस’ घरात आणि घराबाहेर घमासान माजले होते. कारण होते जुबैर खान. वीकेंड एपिसोडला सलमानने जुबैरला जाम फैलावर घेतले होते.  इतके की, जुबैरला ह्यतेरी औकात क्या? असे नॅशनल टीव्हीवर सलमान बोलून गेला होता. ‘ जब तुम यहां आए थे तो तुम्हारी कोई औकात वैसे ही नहीं थी. तुझे कुत्ता न बना दिया तो मेरा नाम सलमान नहीं,’ असे काय काय सलमान झुबैरला बोलला होता. सलमानकडून नॅशनल टीव्हीवर झालेला हा अपमान जुबैरच्या चांगल्याच जिव्हारी लागला होता आणि त्याच रात्री ‘बिग बॉस’च्या घरात  झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर जुबैरने  सलमानविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. इतकेच नाही तर उपचारानंतर दवाखान्यातून निघाल्यानंतर मीडियासमोर हिंमत असेल तर बॉडीगार्डशिवाय समोर ये, अशा शब्दांत सलमानला जाहिर धमकीही दिली होती. जुबैरच्या याच धमकीला सलमानने अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे. आता सलमानच्या या उत्तरावर जुबैर कसा रिअ‍ॅक्ट होतो, ते बघूच!

- Advertisement -