Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनतैमूरला वयाच्या या वर्षी पाठवणार बोर्डिंग स्कूलमध्ये?

तैमूरला वयाच्या या वर्षी पाठवणार बोर्डिंग स्कूलमध्ये?

नवाब सैफ अली खान सध्या आपला आगामी चित्रपट कालाकांडीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनसाठी आला असताना सैफला तैमूरबाबत प्रश्न विचारण्यात आले यावर सैफने आश्चर्यकारक उत्तर दिले. सैफ म्हणाला शिक्षणसाठी तो सगळ्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या तैमूरला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकणार आहे. वयाच्या १३ वर्षी तैमूरला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात येईल. पुढे सैफ म्हणाला की, अशा खूप सऱ्या गोष्टी आहेत जी मुलं घरातहुन शिकू शकत नाहीत. त्या गोष्टी बोर्डिंग स्कूलमध्ये शिकवल्या जातात. रायडिंग, आऊटडोर अशा अनेक गोष्टी शिकल्यानंतर मुलं आपल्या पायावर उभी राहतात. सैफच्या मतं मुलांसाठी एक चांगले वातावरण, शांतता आणि आपल्या वयाच्या दुसऱ्या मुलांची साथ गरजेच आहे. घरातल्या वातावरणा पेक्षा चांगले वातावरण त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये मिळते.

याआधी ही सैफने तैमूरला सगळ्या झगमगाटात स्टारकिड्स म्हणून मोठा होताना त्याले बालपण हिरावले जायला नको म्हणून  बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्याभोवतीच्या स्टारडमची कल्पना आम्हाला आहे. करिना आणि मी याबद्दल चर्चाही केलीय. पण या सगळ्यांमुळे त्याचे लहानपण, त्याचा निष्पापपणा प्रभावित होऊ नये, असे आम्हाला वाटतयं त्यामुळे त्यांने आणि करिनाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
याआधी ही पतौडी घराण्यात विदेशात शिकणे ही नवी गोष्ट नाही. पतौडी कुटुंबातील प्रत्येकजण विदेशात शिकला आहे. सैफ सुद्धा वयाच्या नवव्या वर्षांपासून इंग्लडच्या एका प्रतिष्ठित बोर्डिंग स्कूलमध्ये शिकला आहे.
कालाकांडीमध्ये सैफ शिवाय कुणाल रॉय कपूर, विजय राज, अमायरा दस्तूर, दीपक डोबरियाल, अक्षय ओबरॉय, ईशा तलवार, नील भूपलम, शिवम पाटील सारखे कलाकार आहेत. हा एक  डार्क कॉमेडी थ्रीलर आहे. या चित्रपटाद्वारे अक्षत वर्मा डायरेक्शन डेब्यू करतो आहे. हा चित्रपट १२ जानेवारी २०१८ ला रिलीज होणार आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात ७३ कट्स सांगितले होते.सैफची विचित्र हेअरस्टाईल, त्याचे फरकोटमधील लूक सगळेच तुमच्या मनात उत्सुकता निर्माण करते. डार्क कॉमेडी सिनेमात बोल्डनेसचा तडकाही असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments