Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनचक्क '२१ वर्षांनी' लहान असलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला अजय देवगण !

चक्क ‘२१ वर्षांनी’ लहान असलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला अजय देवगण !

आजकालच्या काळात सिनेसृष्टीत निम्मे वय असलेले अभिनेते अभिनेत्रीबरोबर काम करताना दिसून येत आहेत. त्यातच मोडला जाणारा बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता अजय देवगण आपल्यापेक्षा वयाने २१ वर्ष लहान असलेली अभिनेत्रीसोबत चित्रपटात काम करणार आहे.

अजय देवगण साऊथची सनसनी असलेली राकुल प्रित सिंगसोबत एका रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरु होणार असून राकूल एका शहरी मुलीची भूमिका साकारणार आहे. यामध्ये विशेष म्हणजे अजय देवगणचे वय ४८ वर्ष इतके असून, राकुल २७ वर्षांची आहे.चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिध्द एडिटर अकिव अली करणार असून अद्यापही चित्रपटाचे शीर्षक निश्चित केले नाही आहे. अकिवने ‘अग्निपथ, गॅगस्टर, लाइफ इन अ मेट्रो, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, बर्फी’ यांसारखे चित्रपट एडिट केले आहेत.या चित्रपटात तब्बूदेखील झळकणार आहे. चित्रपटाला टी-सीरिजचे भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग प्रोड्यूस करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments