अक्षय कुमारचा 27 डिसेंबरला आगामी चित्रपट ‘गुड न्यूज’ येत आहे. त्याचे चे पोस्टर समोर आले आहे. अक्षयने ट्विटरवर वेगवेगळे पोस्टर शेअर केले आहेत.
अक्षय फोटोमध्ये दोन बेबी बम्प्सच्या मध्ये फसलेला दिसत आहे. यासोबत त्याने लिहिले आहे, ख्रिसमसच्या या सीजनमध्ये काही गुड न्यूज पसरवू. वर्षाच्या आगामी सर्वात मोठ्या गुफ-अपसाठी सोबत राहा.
चित्रपटाच्या इतर पोस्टर्सपैकी एकामध्ये दिलजीत दोसांझ अक्षय सारखी पोज देत आहे. तर दुसऱ्यामध्ये अक्षयसोबत करिना कपूर, दिलजीत दोसांझ आणि किआरा आडवाणी दिसत आहेत.
चित्रपटात अक्षय आणि अशा विवाहित जोडप्याच्या रूपात दिसणार आहेत जे बाळासाठी प्रयत्न करत असतात. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटातून राज मेहता दिग्दर्शक म्हणून डेब्यू करत आहे. हा चित्रपट 27 डिसेंबरला रिलीज होणार आहे