अमृता ठरली ‘पहिली’ मराठी अभिनेत्री!

- Advertisement -

गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर अमृता खानविलकर या नावाला धरून खूप चर्चा झाल्या. अमृताचा हिंदी मधला वाढता प्रवास असो की तिच्या फॅशनिस्टा असण्याची चर्चा असो. मात्र खास चर्चा होती ती तिच्या ट्विटर अकाऊंटची. ९०K ट्विटर फॉलोअर्स झाल्यानंतर अमृता खानविलकरच्या सगळ्या चाहत्यांना उत्सुकता होती ती १००K ची (एक लाख फॉलोअर्स) आणि अवघ्या काही दिवसातच अमृताने १००Kचा टप्पा गाठला आणि ट्विटरवर १००K फॉलोअर्स असणारी अमृता खानविलकर पहिली मराठी अभिनेत्री ठरली.

अमृता आणि तिच्या चाहत्यांमध्ये जणू एक नातेच आहे. ट्विटरवर जवळपास ५० च्या घरात तिच्या नावाचे फॅनक्लब्स आहेत. सगळ्या सोशल मीडिया साईट्सवर अमृताचा असणारा सक्रिय सहभाग हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. अमृता खानविलकरची प्रसिद्धी आपण मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही पाहू शकतो. तिची आणि बॉलिवूडस्टार रणवीर सिंगची घट्ट मैत्रीही आपल्याला तिच्या ट्विटर अकाउंटवरून दिसते.

या सगळ्यावर अमृता म्हणते की ‘खूप छान वाटतंय आज. मी जेव्हा ट्विटर अकाऊंट सुरु केलेलं तेव्हा १००K फॉलोर्स असणं म्हणजे काय हे माहितही नव्हतं. पण आज ते शक्य झालंय याचं सगळं श्रेय जातं ते माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या माझ्या चाहत्यांना. त्यांच्यामुळेच खरंतर हे शक्य झालंय. १००K हा फक्त मी एक नंबर नाही समजत तर पुढे काम करण्यासाठीची मिळालेली एक ऊर्जा मानते.’

- Advertisement -
- Advertisement -