Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनया अभिनेत्रीचा बेली डान्स होतोय व्हायलर!

या अभिनेत्रीचा बेली डान्स होतोय व्हायलर!

Nora Fatehiबिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोच्या सीजन-९ मध्ये सहभागी झालेली स्पर्धक नोरा फतेही एक उत्कृष्ट बेली डान्सर आहे. आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणारी मॉडेल आणि अभिनेत्री नोरा फतेही आपल्या डान्स आणि लव्ह लाइफमुळे नेहमीच चर्चेत असते. 

नोराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये ती जबरदस्त बेली डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडीओ समोर आला असून, तिचे डान्स बघून चाहते घायाळ होत आहे. शिवाय तिच्या डान्सचे कौतुकही केले जात आहे. त्यामुळेच की काय केवळ चारच दिवसांत तिचा हा व्हिडीओ चार लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बंगळुरू येथे पार पडलेल्या मिस इंडिया फेमिना दीवा अवॉर्ड्स २०१८ दरम्यानचा आहे. नोरा फतेहीने आपल्या स्टेज परफॉर्मन्स दरम्यानचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे सोलो परफॉर्मन्ससाठी तिने कुठल्याही प्रकारचा सराव केला नव्हता. याविषयी नोराने कॅप्शनमध्ये लिहिले की, म्युझिक ऐकता ऐकता मी परफॉर्मन्स पूर्ण केला.
दरम्यान, नोरा फतेही हिला खरी ओळख ‘बाहुबली’ या चित्रपटातील ‘मनोहारी…’ या गाण्यामुळे मिळाली. या गाण्यात तिने धमाकेदार परफॉर्मन्स दिला आहे. प्रभाससोबतची तिची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. तिचा परफॉर्मन्स बघून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments