Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनबीग बॉस विजेता शीव वीणासोबतच लग्न करणार

बीग बॉस विजेता शीव वीणासोबतच लग्न करणार

मुंबई : रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता शिव ठाकरे आणि वीणा जगताप लग्न बंधनात अडकणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला लग्नाची पत्रिका मिळेल असंही शिवने एका प्रश्नाचे उत्तर देताना माध्यमांना सांगितलं.

बीग बॉस संपल्यानंतरही शिव-वीणाची जोडी बाहेरही दिसेल का असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचेही उत्तर शिवने दिले आहे. ‘मी आता आमचं नात कसं असेल हे सांगण्यापेक्षा तुम्हाला पुढे ते दिसेलच. जेवढं तुम्हाला आतमध्ये दिसायचं तेच बाहेरही दिसेल. तिचं आणि माझं दोघांचही करियर आहे. या सर्वांचा विचार करुन निर्णय घेऊ,’ असं शिवने सांगितलं.

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या  बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यामध्ये शिवच्या नावाची घोषणा करण्यात आली. गेल्या १०० दिवसांपासून बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या स्पर्धकांपैकी नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर व वीणा जगताप हे सहा स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. मात्र त्यापैकी शिवने बाजी मारत जेतेपदाची ट्रॉफी आणि १७ लाखांची बक्षिसाची रक्कमही जिंकली. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे शिव आणि वीणा जगताप. या दोघांच्या मैत्रीचे किस्से घरातच नाही तर घराबाहेर प्रेक्षकांमध्येही चांगलेच रंगले. शिव आणि वीणाचं हे प्रेम ‘बिग बॉस’नंतरही कायम राहणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. यासंदर्भात बोलताना शिवने घरात तुम्ही जे ऐकलं तेच पुढे होणार असल्याचं सांगत लग्नाचे संकेत दिले आहेत. ‘शंभर टक्के प्रेक्षकांनी जे कार्यक्रमामध्ये ऐकलं तेच होणार आहे. त्यात काहीच बदल होणार नाही. माझ्यासाठी त्या शंभर दिवसांमध्ये झालेली कोणतीही गोष्ट शो जिंकण्यासाठी मी केली नाही,’ असं शिवने स्पष्ट केलं. कार्यक्रम संपल्यानंतरही शिव-वीणाची जोडी बाहेरही दिसेल का असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचेही उत्तर शिवने दिले आहे. ‘मी आता आमचं नात कसं असेल हे सांगण्यापेक्षा तुम्हाला पुढे ते दिसेलच. जेवढं तुम्हाला आतमध्ये दिसायचं तेच बाहेरही दिसेल. तिचं आणि माझं दोघांचही करियर आहे. या सर्वांचा विचार करुन निर्णय घेऊ,’ असं शिवने सांगितलं. इतकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लग्नाची पत्रिका मिळेल असंही शिवने एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितलं.

दरम्यान, वीणाकडून राखी बांधून घेण्यास सांगणाऱ्या आईला या निर्णयाबद्दल सांगितले आहे का असा सवाल शिवला विचारण्यात आला. यावर बोलताना त्याने आईला यासाठी राजी करणे कठीण असले तरी मी ते करुन दाखवेन असा विश्वास शिवने व्यक्त केला. ‘आईला यासाठी राजी करायला खूप वेळ लागेल मला. मी तिचा लाडका मुलगा आहे त्यामुळे मी तिला नक्की मनवेल असा मला विश्वास आहे,’ असं शिवने सांगितले. ‘बिग बॉस मराठी २’च्या घरात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात साजरा करण्यात आलेल्या कुटुंबीयांसाठी विशेष आठवड्यात शिवची आई सहभागी झाली होती. त्यावेळी शिवच्या आईने वीणाला बहिण म्हणून हाक मारण्यास शिवला सांगतले होते. वीणासोबतच हिना आणि नेहालासुद्धा बहिण मानण्याचा सल्ला शिवच्या आईने दिला होता. इतकंच नाही तर रक्षाबंधनला त्यांच्याकडून राखी बांधून घेण्यासही शिवच्या आईने शिवला सांगतले होते. मात्र आता विजेता झाल्यानंतर शिवने वीणाशी लग्न करणार असल्याचे सांगितले असून खरोखरच हे दोघे विवाहबंधनात अडकणार का याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments