Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनश्रेयस तळपदेच्या घरी सरोगसीद्वारे नन्ही परीचे आगमन

श्रेयस तळपदेच्या घरी सरोगसीद्वारे नन्ही परीचे आगमन

लग्नाच्या १४ वर्षांनंतर ४ मे रोजी मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे बाबा झाला. श्रेयस आणि दीप्तीच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. सरोगसीच्या माध्यमातून श्रेयस बाबा झाला. श्रेयस आणि दीप्ती हाँगकाँगमध्ये सुट्टीचा आनंद घेत असताना त्यांना ही गोड बातमी कळली.

मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस म्हणाला की, ‘आम्हाला डॉक्टरांकडून १० ते १२ मे दरम्यानची तारीख सांगण्यात आली होती. म्हणून मी दीप्तीला घेऊन हाँगकाँगला सुट्टयांचा आनंद लुटायला गेलो, आम्ही क्रुझवर जाण्याचा विचारही केला होता. पण त्याच दिवशी सरोगेट आई वेळेच्या आधीच बाळाला जन्म देऊ शकते असे कळले त्यामुळे आम्ही आमचे सगळे प्लॅन रद्द केले आणि त्या रात्रीच भारतात परतलो.’

श्रेयस पुढे म्हणाला की, ‘ज्या दिवशी आम्ही भारतात उतरलो त्याचदिवशी आम्हाला मुलगी झाल्याची गोड बातमी कळली आणि आम्ही लगेच रुग्णालयात धाव घेतली.’ श्रेयस हसत म्हणाला की, ‘आमची मुलगी फार हट्टी आहे. तिला सोडून आम्ही हाँग काँगला जाऊ नये असंच बहुधा तिला वाटत असावं.’

मुलीच्या नावाबद्दल त्याला प्रश्न विचारला असता श्रेयस म्हणाला की, ‘त्यांनी काही नावं शोधून ठेवली आहेत. पण नक्की कोणतं नाव निश्चित करणार यावर घरच्यांचा निर्णय अजून व्हायचा आहे.’ तसेच सरोगसीद्वारे मुलं होण्याचा मार्ग स्वीकारण्याबद्दल श्रेयस म्हणाला की, ‘काही समस्या होत्या, शिवाय आमच्या डॉक्टरांनी हा सर्वात्तम पर्याय असल्याचेही सांगितले. त्यामुळेच आम्ही सरोगसीद्वारे आई- बाबा होण्याचा निर्णय घेतला. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णयांपैकी एक निर्णय आहे.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments