Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeट्रेंडिंगअन् दीपिका पदुकोण सिध्दीविनायकाच्या चरणी

अन् दीपिका पदुकोण सिध्दीविनायकाच्या चरणी

Deepika Padukone Siddhivinayak Mandir,Deepika, Padukone, Siddhivinayak, Mandir,Deepika Padukone, Siddhivinayak Mandir,Chhapaakमुंबई : दीपिका पदुकोणचा बहुप्रतिक्षित ‘छपाक’ सिनेमा आज शुक्रवार (१० जानेवारी) रोजी प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित होताच दीपिका सिद्धिविनायक मंदिरात गजाननाच्या दर्शनाला गेली. दीपिका तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या क्षणी ती सिद्धिविनायक मंदिरात जाते. दीपिकाने यावेळी क्रीम रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. ड्रेसला साजेसे हेवी वेट कानातलेही तिने घातले होते.

Deepika Padukone Siddhivinayak,Mandir,Deepika, Padukone, Siddhivinayak,Deepika Padukone, Siddhivinayak Mandir

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) मध्ये हिंसाचार प्रकरणानंतर दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती. त्यानंतर दीपिकावर भाजप आणि समर्थकांकडून प्रचंड टीका झाली होती. भाजपमध्ये दीपिकावरून दोन गट पडले होते. छपाकला बॉय कॉट करा. अशा प्रकारचे संदेश फिरले होते. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये हा चित्रपट टॅक्सफ्री करण्यात आला आहे.

Siddhivinayak Mandir Deepika Padukone,Siddhivinayak Mandir, Deepika Padukone,Siddhivinayak, Mandir, Deepika, Padukone

‘छपाक’ सिनेमात दीपिकासोबत विक्रांत मेसी मुख्य भुमिकेत आहे. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा अॅसीड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. मेघना गुलझार यांनी दिग्दर्शन केलेला हा सिनेमा आज १० जानेवारीला प्रदर्शित झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments