Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनदीपिकाच्या ‘छपाक’ची बॉक्स ऑफिसवर छाप!

दीपिकाच्या ‘छपाक’ची बॉक्स ऑफिसवर छाप!

Chhapaak Deepika Padukone,Chhapaak, Deepika, Padukone,Chhapaak Deepika, Deepika Padukone

मुंबई : दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’ चित्रपटाची दुस-या दिवशी बॉक्स ऑफिसवर छाप दिसून आली. ‘छपाक’चं  (बॉक्स ऑफिसवर) कलेक्शन चांगलं झालं आहे. छपाकनं पहिल्या दिवशी ४.७७ कोटींची कमाई केली होती. तर, दुस-या दिवशी चित्रपटानं तब्बल ३० – ४० टक्के वाढ करत ६ कोटींच्यावर कमाई केली आहे. त्यानुसार दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’ चित्रपटाने दोन दिवसांत सुमारे ११ कोटींची कमाई केली आहे.

दीपिकानं नवी दिल्लीतील जेएनयू हिंचारानंतर विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर छपाकवर बंदी घालण्याची मागणी काही चाहत्यांनी ट्विटरवर केली होती. त्यातूनच सोशल मीडियावर #BoycottChhapaak ट्रेंड होत होता. त्याचा फटका दीपिकाला पहिल्या दिवशी बसला. छपाक च्या कमाईची माहिती बॉक्स ऑफिस इंडियाने दिली आहे.

दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’ चे बजेट सुमारे ३५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ‘छापाक’ ची कथा मालती म्हणजेच अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या हिच्या जीवनावर आधारित आहे. दरम्यान, या सिनेमा प्रदर्शित होण्याआधी अनेक वादात सापडला होता.

दीपिकानं नवी दिल्लीतील जेएनयू हिंचारानंतर विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर छपाकवर बंदी घालण्याची मागणी काही चाहत्यांनी ट्विटरवर केली होती. एवढेच नाही तर, काँग्रेस प्रशासित तीन राज्यांनी ‘छपाक’ या दीपिका पदुकोणच्या चित्रपटाला अगोदरच करमुक्त करण्याची घोषणा केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments