Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशअभिनेत्री तब्बूसोबत जोधपूर विमानतळावर गैरवर्तन!

अभिनेत्री तब्बूसोबत जोधपूर विमानतळावर गैरवर्तन!

Tabuजोधपूर : बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल गुरुवारी जोधपूर कोर्टात लागणार आहे. त्या सुनावणीसाठी जोधपूरला गेलेल्या अभिनेत्री तब्बूसोबत एकाने गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

जोधपूर विमानतळावर उतरल्यानंतर तब्बूभोवती सुरक्षारक्षकांनी कडे घातले. दरम्यान, आरोपीनेही सुरक्षारक्षक असल्याचे भासवून तब्बूभोवती घेराव घातला. याच बहाण्याने त्याने तब्बूला हात लावण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच तब्बू संतापली.
अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू आणि सोनाली बेंद्रे जोधपूरला पोहचले आहेत. जोधपूर सत्र न्यायालयात या प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार आहे.

काय आहे प्रकरण?
राजस्थानातील जोधपूरमधल्या काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानसह अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलमही आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. सलमानने शिकार केली असून, इतर कलाकारांनी त्याला प्रोत्साहन दिल्याचा दावा साक्षीदारांनी केला आहे.
२० वर्षांपूर्वी म्हणजे १९९८मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाचे चित्रीकरण जोधपूरमध्ये सुरू होते. त्यावेळी सलमानने घोडा फार्म हाऊस आणि भवाद गावात २७-२८ डिसेंबरच्या रात्री हरणांची, तर कांकाणी गावात १ ऑक्टोबरला काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.
सलमानविरोधात १९९८मध्ये ४ केस दाखल करण्यात आल्या. ३ प्रकरणे हरणांच्या शिकारीची असून, चौथे प्रकरण आर्म्स अॅक्टचे आहे. यात कांकाणी गाव केस, घोडा फार्म हाऊस केस, भवाद गाव केस आणि शस्त्रास्त्र केस यांचा समावेश आहे. सलमानला अटक करताना त्याच्या खोलीतून पोलिसांनी पिस्तूल आणि रायफल हस्तगत केली होती. दोन्ही शस्त्रांच्या परवान्याचा कालावधी संपला होता.
जीवन अधिनियमाच्या कलम १४९ अंतर्गत काळवीट शिकारीसाठी ७ वर्षांपेक्षा जास्त कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. काही वर्षांपूर्वी ही शिक्षा ६ वर्षांपर्यंत होती. सलमानचे प्रकरण २० वर्ष जुने आहे. अशा स्थितीत ६ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा शक्य आहे. हे कलम सह आरोपींवरही लागू होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments