‘ज्युली २’ फेम अभिनेत्री ‘राय लक्ष्मी’ रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार बोल्ड अवतार!

- Advertisement -

‘ज्युली २’ फेम ‘राय लक्ष्मी’ मराठी सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.चांगल्या संहितेचे शोधात असलेली राय लक्ष्मी पुणे भेटीवर आली असताना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ती बोलत होती.यावेळी फ्रिकऑउट एन्टरटेन्मेंटचे आकर्षण कटीआर, संजय कोलकत्तावाला हे देखील उपस्थित होते. आता पर्यंत ५० हून जास्त दक्षिणेतील चित्रपट झळकलेली राय लक्ष्मी आता मराठी सिनेमांच्या प्रेमात पडली आहे.मुळात ती दाक्षिणात्या सिनेमात काम करत असली तरीही ती महाराष्ट्रीयन असून ती मुंबईत राहते.त्यामुळे राय लक्ष्मीला मराठी भाषेवर चांगले प्रभुत्त्व आहे.ती उत्तम मराठी बोलते. मराठी सिनेमा संवेदनशील असतात. अशा संवेदनशील सिनेमाचा आपण हि भाग असाव असं तिला वाटले

आणि म्हणून मराठी सिनेमा करण्याचा निर्धार तिने केल्याचे सांगितले.तिचा सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष निर्माते-दिग्दर्शक पहलाज निहलानी हे वितरक व दीपक शिवदासानी दिग्दर्शक असलेला  ‘जुली-२’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता. तेव्हा पासून या सिनेमाची चर्चा होती. ‘जुली २’ हा ‘जुली’ सिनेमाचा सिक्वल नसल्याचेही तिने यावेळी स्पष्ट केले.या सिनेमाचे कथानक चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रींच्या संघर्षावर आधारित आहे. आता पर्यंत  दाक्षिणात्या सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी  राय लक्ष्मी  जुली 2  सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतेय.एका सामान्य तरुणीचा अभिनेत्री बनण्यापर्यंतचा प्रवास ‘जुली २’ या सिनेमात दाखवण्यात आला आहे.अभिनय करण्यासाठी करावा लागणारा संघर्षही या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
‘ज्युली 2’ सिनेमात हॉटनेस आणि बोल्डनेस असा सगळा मसाला रसिकांना पाहायला मिळणार आहे.हॉटनेसचा तडका लावणारी राय लक्ष्मी एक प्रसिद्ध मॉडेल म्हणूनही ओळखली जाते. केवळ एवढेच नाही तर कॅप्टन कूल महेन्द्रसिंह धोनी याची एक्स-गर्लफ्रेन्ड म्हणूनही ती ओळखली जाते.२००८ च्या आयपीएलदरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरले होते.त्यादिवसांत दोघेही लग्न करणार,अशाही बातम्या आल्या होत्या.अर्थात हे रिलेशन फार काळ चालू शकले नाही. मी व धोनी एकमेकांना डेट करत होतो, असा दावा खुद्द राय लक्ष्मीनेच केला होता.

- Advertisement -