Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनमलंगची प्रतिक्षा व्हॅलेंटाईनडेला संपणार

मलंगची प्रतिक्षा व्हॅलेंटाईनडेला संपणार

Malang Aditya Roy Kapur,Malang, Aditya, Roy, Kapurदिग्दर्शक मोहित सुरीने त्याच्या आगामी ‘मलंग’ चित्रपटातील अभिनेता आदित्य रॉय कपूरचा फर्स्ट लूक रिव्हील केला आहे. या पोस्टरमध्ये आदित्यचे सिक्स पॅक एब्स आणि मस्कुलर बॉडी दिसत आहे. सोबतच पोस्टरवर लिहिले आहे – वेडेपणाची सुरुवात. चित्रपट व्हॅलेंटाइन वीकमध्ये ७ फेब्रुवारी रोजी रिलीज होईल. तर चित्रपटाचा ट्रेलर येत्या ६ जानेवारीला रिलीज होणार आहे.

‘मलंग’मध्ये आदित्य शिवाय अनिल कपूर, कुणाल खेमू आणि दिशा पाटणी काम करत आहेत. अनिलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मेकर्सनी त्यांचा लूक रिव्हिल केला होता. चित्रपटात आदित्य पोलिस अधिका-याची भूमिका साकारली आहे. मोहितसोबतचा त्याचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी या जोडीचा ‘आशिकी २’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात आदित्यच्या अपोझिट दिशा पाटणी असून तिने इन्स्टाग्रामवर तिचा लूक शेअर केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments