Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजन‘मीडियम स्पायसी’५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

‘मीडियम स्पायसी’५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

Medium Spicy,Medium, Spicy,Marathi Movieअभिनेता सागर देशमुखनं ‘भाई ः व्यक्ती की वल्ली’, ‘हंटर’ या चित्रपटातून त्याचा दमदार अभिनय दाखवून दिला. मोहित टाकळकर यांच्या ‘मीडियम स्पायसी’ या आगामी चित्रपटातही सागर हट के भूमिकेत दिसणार आहे. सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाबद्दल त्याच्या स्टारकास्टमुळे उत्सुकता आहे. ‘हंटर’, ‘वाय झेड’ आणि ‘गर्लफ्रेंड’ नंतर सागरचा सईसोबत हा चौथा चित्रपट आहे. ५ जूनरोजी प्रदर्शित प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे.

निर्मात्या विधी कासलीवाल म्हणाल्या, या चित्रपटात अनेक मनोरंजक व्यक्तिरेखा असून सागरची व्यक्तिरेखा या कथेचा एक अविभाज्य भाग आहे.’ सागर सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मालिकेत बाबासाहेबांची भूमिका साकारतो आहे. शहरातल्या नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या ‘मीडियम स्पायासी’ प्रेक्षकांना नक्की आवडेल. या चित्रपटाची हट के स्टारकास्ट पाहता सागरसह सर्वांच्याच भूमिकांबद्दल उत्सुकता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments