Mumbai-saga: ‘मुंबई सागा’ सिनेमाचा टीझर रिलीज,19 मार्चला होणार प्रदर्शित

- Advertisement -
mumbai-saga-movie-teaser-out-anthor-action-pack-john-abraham-and-imran-hashmis
mumbai-saga-movie-teaser-out-anthor-action-pack-john-abraham-and-imran-hashmis

जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीचा अ‍ॅक्शन पॅक असलेल्या ‘मुंबई सागा’ या सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. सोबतच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलीय. येत्या 19 मार्चला ‘मुंबई सागा’ चित्रपटगृहात धडकणार आहे.

जॉन अब्राहम आणि इमारानसोबतच या सिनेमात अनेक बडे स्टार झळकणार आहेत. काजल अग्रवाल या अभिनेत्रीसह प्रतिक बब्बर, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, अमोल गुप्ते, सुनील शेट्टी, गुलशन ग्रोवर असे बडे स्टार मुख्य भूमिकेत झळकतील. संजय गुप्ता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

जॉन अब्राहमने सोशल मीडियावर सिनेमाचा टीझर शेअर केलाय. “जेव्हा बॉम्बे मुंबई नव्हती आणि रस्त्यांवर हिंसेचं राज्य़ होतं!” असं कॅप्शन जॉनने टीझरला दिलं आहे. या सिनेमात जॉन पुन्हा एकदा एका गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर इमरान हाश्मी पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळेल.

- Advertisement -

‘मुंबई सागा’ या सिनेमात मुंबईतील गँगवॉर पाहायला मिळेल. टीझर वरुनच सिनेमात धडाकेबाज अ‍ॅक्शन पाहायला मिळणार याचा अंदाज येतोय.

धूम, मद्रास कॅफे, सत्यमेव जयते, फोर्स अशा सिनेमांमध्ये जॉन अब्राहमची अ‍ॅक्शन पाहायला मिळाली आहे. जॉन ‘अ‍ॅटक’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये सध्या व्यस्त आहे. तर दुसरीकडे इमरान हाश्मीनेदेखील त्याच्या ‘चेहरे’ सिनेमाचं पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केलीय.

 

 

- Advertisement -