संगीत दिग्दर्शक प्रभाकर जोग यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर

- Advertisement -

पुणे : गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त गदिमा प्रतिष्ठानतर्फे यंदाचा गदिमा पुरस्कार संगीत दिग्दर्शक प्रभाकर जोग यांना जाहीर झाला आहे. आनंद माडगूळकर, श्रीधर माडगूळकर, प्रकाश भोंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

गदिमांच्या पत्नी विद्याताई यांच्या स्मरणार्थ गृहिणी सखी सचिव पुरस्कार पुष्पा भट, चैत्रबन पुरस्कार निवेदिका धनश्री लेले, विद्या प्रज्ञा पुरस्कार गायिका सावनी रवींद्र यांना देण्यात येणार आहे. शालान्त परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या आरोही खोडकुंभे या विद्यार्थिनीस गदिमा परितोषिकाने सन्मानित केले जाणार आहे.
गदिमा पुरस्काराचे वितरण १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे. विख्यात तबलावादक पं. सुरेश तळवलकर या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उत्तरार्धात अमेय आणि दीपिका जोग, प्रभाकर जोग यांच्या स्वरचनांवर आधारित ‘स्वर आले जुळुनी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

- Advertisement -