Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजननवाजुद्दीन, अथियाचा मोतीचूर चकनाचूरमध्ये हटके लूक

नवाजुद्दीन, अथियाचा मोतीचूर चकनाचूरमध्ये हटके लूक

motichoor chaknachoor nawazuddin siddiqui athiya shetty new movie
गंभीर भूमिकेत दिसणारा नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच अथिया शेट्टी सोबत एका विनोदी चित्रपटात दिसणार आहे. ‘मोतीचूर चकनाचूर’ या आगामी चित्रपटात एका ३६ वर्षीय लग्नाळू व्यक्तीची कथा दाखविण्यात आली आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे.

नवाजुद्दीन नवरदेवच्या गेटअपमध्ये दिसत असून सुनिल शेट्टीची कन्या अथिया नवरीच्या लूकमध्ये दिसत आहे. लग्न आणि हनिमूनसाठी ते फिरायला जात असल्याचा प्रसंग पोस्टरमधून दिसून येत आहे.

नुकत्याच रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये दोघांचंही नवीन लग्न झालेलं दिसतय. या पोस्टरमध्ये नवाजुद्दिन मध्यम वयीन तरुण दाखवला असून तो लग्नानंतर संतुष्ट दिसतोय. तर नववधू अथिया लग्नानंतर जग फिरण्यासाठी उत्सूक झालेली पाहायला मिळत आहे. दोघांनीही या चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर केला आहे.

नुकताच ‘मोतीचूर चकनाचूर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्याला लोकांची पसंती मिळत आहे. येत्या १५ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments