पालिकेकडून कोणतीही नोटीस नाही-बिग बी

- Advertisement -

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांना अनधिकृत बांधकामाप्रकरणी बीएमसीनं नोटीस पाठवली आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. ती बातमी चुकीची आहे, असा खुलासा अमिताभ यांनी केलाय. मीडियाला सगळंच आधी कळतं, पण मला ती नोटीस अजून मिळायची आहे, अशी उपरोधात्मक भाषा वापरून अमिताभ यांनी आपला संताप व्यक्त केला.

मी संबंधित इमारतीत कोणतही बांधकाम केलं नाही. मी ती प्रॉपर्टी जेव्हा विकत घेतली, तेव्हापासून एकही वीट मी ना जोडली ना कमी केली, असं ते म्हणालेत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मला शांतता हवीय, असं म्हणत त्यांनी आपल्या ब्लॉगचा शेवट केलाय.

काय म्हटलंय बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये?

- Advertisement -

बीएमसीकडून मला नोटीस आली याबद्दल माझ्या ब्लॉगवर काहींनी संताप व्यक्त केला. आता ही गोष्ट वेगळी की ती नोटीस मला अजून मिळायची आहे. येईल बहुधा लवकरच. संबंधित व्यक्तीला माहिती मिळण्याआधीच मीडियाला बातमी मिळालेली असते. हे फक्त मीडियालाच शक्य होतं. शेवटी ते चौथा स्तंभ आहेत ना !!

ही काही छोटी गोष्ट नाही बरं का ! आयुष्याच्या या टप्प्यावर मला शांतता हवी आहे. प्रकाशझोत आणि महत्त्व दिलं जाण्यापासून स्वातंत्र्य हवं आहे. आयुष्याची शेवटची काही वर्षं मला स्वतःसोबत जगायची आहेत. मला बिरुदं नकोत, मला भीती वाटते त्यांची. मला हेडलाईन्स नकोत. मला मान्यताही नको, मी त्याला पात्र नाही.

- Advertisement -