Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनराखी सावंत म्हणाली ते तुम्हालाही पटणार नाही

राखी सावंत म्हणाली ते तुम्हालाही पटणार नाही

rakhi sawant

राखी सावंत नाव समोर आलं की, तिच्या बद्दल चर्चा सुरु होते. राखी नेहमीच तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे चर्चेत राहते. पुन्हा एकदा राखी असंच काहीसं म्हणाली आहे. राखीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ राजीव खंडेलवालच्या ‘जज्बात’ शोमधील आहे. तो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

या व्हिडिओमध्ये राजीव म्हणतो की, ‘आज या शोमध्ये कोणतीच कॉन्ट्रोव्हर्सी होणार नाही. कारण मी आज राखी सावंतशी नाही तर निरू भेडाशी बोलणार आहे.’ स्वतःचं मुळ नाव ऐकून ती थोडी बावचळते आणि नंतर ती मीच आहे असं सांगते. यानंतर राजीव राखीला तिच्या बालपणाबद्दल विचारतो.

राखी म्हणाली आम्ही बाजूच्यांनी फेकलेलं अन्न खायचो…

यावर राखी म्हणते की, ‘आजही ते दिवस आठवले की माझे हात कापतात. खरं सांगणं तसं फार सोप्पं नाहीये. आम्ही फार गरिबीतून वर आलो आहोत. जेव्हा मी आईच्या पोटात होते तेव्हा आई दगड, विटांवर स्वयंपाक करायची. आई सांगायची की, जेव्हा आमच्याकडे खायला काही नसायचं तेव्हा बाजूच्यांनी फेकलेलं अन्न आम्ही खायचो. माझी आई एका रुग्णालयात आया म्हणून काम करायची.’ यानंतर राखी रडू कोसळलं

राखीने जो व्हिडिओ शेअर केला तो फार जुना असला तरी नव्याने व्हायरल होत आहे. याच शोमध्ये तिने कुटुंबाशी निगडीत गोष्टींचा खुलासा करताना म्हटलं की, माझ्या कुटुंबाने सिनेसृष्टीत जाण्यासाठी मला कधीच पाठिंबा दिला नाही. उलट त्यांचा विरोधच होता. जर मी नाचते हे त्यांना आधी कळलं असतं तर त्यांनी मला बेदम मारलं असतं.

मी सर्जरीरुममध्ये गेले तेव्हा नीरु भेडा होती, नंतर राखी सावंत झाले….

जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा अनेक निर्मात्यांसमोर मी नाचून दाखवलं. अनेकांनी मला वाईट नजरेनेही पाहिलं. ‘यानंतर मी ठरवलं की, अशा लोकांसमोर नाचण्यापेक्षा डान्स बारमधअये डान्स करणं अधिक सोयीस्कर आहे. अनेकांनी माझ्या चेहऱ्याबद्दल मला नावं ठेवलं. यामुळे रंग- रूप सुधरवण्यासाठी मी सर्जरीची मदत केली. सर्जरी रूममध्ये जाताना मी नीरु भेडा होती. पण जेव्हा बाहेर आले तेव्हा राखी सावंत म्हणून बाहेर आले.’

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments