Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनरणबीर कपूर - श्रद्धा कपूरची जोडी दोन वर्षानंतर एकत्र दिसणार

रणबीर कपूर – श्रद्धा कपूरची जोडी दोन वर्षानंतर एकत्र दिसणार

 

ranbir-kapoor-and-shraddha-kapoor-will-be-seen-in-love-ranjans-next-film

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची ही जोडी चित्रपट निर्माता लव रंजन यांच्या पुढच्या चित्रपटात दिसणार आहेत. आज शुक्रवारी याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा आणि शिर्षकाबद्दल संस्पेन्स ठेवण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग करणार आहेत. २६ मार्च २०१२१ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘शमशेर’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त असलेला रणबीर कपूर लव रंजनच्या चित्रपटाचा एक भाग होणार आहे. यापूर्वी सुपरस्टार अजय देवगनचादेखील या चित्रपटातील कलाकारांमध्ये समावेश होता. पण नंतर मतभेदांमुळे अजय देवगणने चित्रपटाला निकार दिला. लव रंजन यांनी दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाची घोषणा केली होती, पण अजय देवगण बाहेर पडताच चित्रपट डबाबंद केल्याचे म्हटले गेले होते.

चित्रपटाचे काम ऑन फ्लोअर असल्याचे निर्मात्यांकडून गेल्या आठवड्यात सांगण्यात आले. आगामी ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेली श्रद्धा कपूर या चित्रपटात रणबीर कपूरच्या अपोझिट झळकणार आहे. या चित्रपटाचा एक भाग बनल्याने उत्साही असल्याचे श्रद्धा कपूर म्हणाली आहे. यापूर्वी लव रंजन यांनी ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘प्यार का पंचनामा’, ‘आकाशवाणी’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments