सलमान-कतरिनाचा रोमान्स

- Advertisement -

अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहेत. सलमान रॉ एजंट असून कतरिना पाकिस्तानी एजंटच्या भूमिकेत आहेत. दोघांचाही उद्देश शांतता पसरवणे आहे. यासाठी दोघेही एकत्र एका मिशनवर असतात. ट्रेलरमध्ये अॅक्शनसोबतच दमदार डायलॉग्ससुद्धा लक्ष वेधून घेतात. ट्रेलरच्या शेवटी सलमान म्हणतो, ‘उसमान अगर तुझमें दम है तो तू अब मुझे रोक कर दिखा।’

येऊ शकतो तिसरा भाग…
‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातून सलमान आणि कतरिनाची जोडी तब्बल पाच वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा तिसरा पार्ट येण्याचीसुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्माता आदित्य चोप्रा आणि सलमान खान यांनी टायगर फ्रेंचाइजचा पुढचा भाग आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सिक्वेल असून येत्या २२ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

- Advertisement -