Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनपाच मराठी चित्रपटांची ‘इफ्फी’ साठी निवड!

पाच मराठी चित्रपटांची ‘इफ्फी’ साठी निवड!

Selection of five Marathi films for IFFI
मुंबई : भारताच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) ‘इंडियन पॅनोरमा’ या विभागात पाच मराठी चित्रपटांची निवड झाली आहे.

५० वा ‘इफ्फी’ २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान पणजी (गोवा ) येथे रंगणार आहे. ‘इफ्फी’ मध्ये शिवाजी लोटन-पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’, सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आयला’, समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’, अनंत महादेवन दिग्दर्शित ‘माई घाट : क्राइम नंबर १०३|२००’, आदित्य राही आणि गायत्री पाटील दिग्दर्शित ‘फोटो प्रेम’ हे पाच मराठी चित्रपट दाखविण्यात येतील.

दोन वर्षांपूर्वीच्या महोत्सवात नऊ, तर गेल्या वर्षी दोन मराठी चित्रपट निवडण्यात आले होते. या विभागात मल्याळम्, बंगाली, तमिळ, तेलुगू या भाषांतील चित्रपटांचा वरचष्मा यंदाही कायम आहे. यावेळी महोत्सवामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांबरोबरच प्रादेशिक भाषांतील २६ चित्रपटांचाही समावेश आहे. तसंच, १५ नॉन फिचर चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. ५०वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments