Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनअजय-अतुलला लागली शाहरुखच्या या सिनेमाची लॉटरी

अजय-अतुलला लागली शाहरुखच्या या सिनेमाची लॉटरी

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची संगीतकार जोडी म्हणजे अजय अतुल. जोगवा, नटरंग, सैराट अशा सिनेमात या जोडगोळीनं दिलेल्या संगीतानं संगीत रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं. मराठीच नाही तर हिंदीतही अजय-अतुल जोडीचा डंका वाजतो. अग्निपथ, सिंघम, पीके अशा विविध हिंदी सिनेमातील संगीतामुळे अजय-अतुलची हिंदी चित्रपटसृष्टीतही वेगळी ओळख निर्माण झाली. दिवसेंदिवस हिंदी चित्रपटसृष्टीत अजय-अतुल या नावाभोवती वेगळं वलय निर्माण झालं आहे. त्यामुळे हिंदीत अजय-अतुल या जोडीला ब-याच ऑफर्स मिळत आहेत.

ठग्स ऑफ हिंदोस्तान आणि सैराटचा रिमेक असलेल्या धडक सिनेमालाही अजय-अतुलचं संगीत लाभणार असल्याच्या चर्चा बी-टाऊनमध्ये रंगल्या आहेत. अशातच आता आणखी एक हिंदी सिनेमा अजय-अतुल जोडीला मिळाला आहे. किंग खान शाहरुखच्या आगामी सिनेमासाठी अजय-अतुल संगीत देणार असल्याचं बोललं जात आहे. शाहरुखशिवाय या सिनेमात कतरिना आणि अनुष्का यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका असतील. आनंद एल. राय दिग्दर्शित या सिनेमाला संगीत देण्यासाठी आधी प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदीची निवड झाली होती. अमितने काही चालीही रचल्या होत्या. मात्र काही कारणास्तव अमितने या सिनेमातून आता माघार घेतल्याचं आता समोर आले आहे. अमितने माघार घेतल्याने आता या आगामी सिनेमाला संगीत देण्याची जबाबदारी अजय-अतुलकडे सोपवण्यात आली आहे. याबाबत अद्याप अमित त्रिवेदीने किंवा अजय-अतुलने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या सिनेमामुळे आता अजय-अतुल या जोडीकडे तीन हिंदी सिनेमांना संगीत देण्याची जबाबदारी आली आहे.
किंग खान शाहरुख आणि ‘तनु वेडस् मनू’ फेम दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी सिनेमाचे नाव काय याबाबत बरेच उलटसुलट तर्क लावले जात आहे. दरम्यान या चित्रपटाचे नाव ‘बंधुआ’ असल्याची अफवा पसरली. यावर लवकरात लवकर स्पष्टीकरण देण्याची आनंद यांना आता गरज वाटत आहे. नुकतेच त्यांनी जाहीर केले की, प्रथमच शाहरुख सोबत करत असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘बंधुआ’ नाही. सध्या मी पटकथेवर काम करत असून अद्याप चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आलेले नाही. ते जसे होईल, आम्ही अधिकृत घोषणा करू, असे ते म्हणाले. चित्रपटाचे कथानक एका ठेंगण्या व्यक्तीभोवती फिरते. यामध्ये एक चांगली प्रेमकथा पाहायला मिळेल अशीदेखील त्यांनी माहिती दिली. या वर्षाच्या शेवटी सिनेमाची शूटींग सुरू होणार असून २०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात तो प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची योजना आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments