‘पद्मावती’बद्दल शर्मिला टागोर म्हणाल्या..

- Advertisement -

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पद्मावती’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांना एका कार्यक्रमात प्रश्न करण्यात आला होता की,चित्रपटासोबत वाद जोडल्यास त्याला किती फायदा होतो? त्यावर शर्मिला म्हणाल्या की, अशा वादांमुळे फार क्वचितच चित्रपटाला फायदा होतो. अनेकदा यामुळे चित्रपटांचे नुकसान होते. जेव्हा त्या लोकांनी ‘पद्मावती’च्या सेटची तोडफोट केली तेव्हा चित्रपटाचा निर्मिती खर्च वाढला. इतकेच नव्हे तर रांगोळीही विस्कटण्यात आली. या सगळ्याचा चित्रपटाला कसा फायदा होणार? असाही प्रश्न उपस्थित केला.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाबद्दल सिनेप्रेमींमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळतेय. पण, त्याचसोबत काही स्तरांतून चित्रपटाला विरोधही केला जातोय. काही दिवसांपूर्वीच राजपूत करणी सेना आणि राजपूतांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संस्थेने ‘पद्मावती’ चित्रपटाचे पोस्टर जाळले होते.

- Advertisement -