शिल्पा शिंदेला बिग बॉस विनरचा मार्ग अडचणीचा!

- Advertisement -

बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये भाभीजी ऊर्फ शिल्पा शिंदे एक चांगली स्पर्धक म्हणून समोर येत आहे. शोच्या सुरुवातीपासूनच शिल्पाला पसंत केले जात असून, तिच्या चाहत्यांकडून तिला आतापर्यंत पाठबळ मिळत आले आहे. आतापर्यंत शिल्पा बऱ्याचदा नॉमिनेट झाली, परंतु प्रेक्षकांनी तिला नेहमीच सुरक्षित केले आहे. सर्वाधिक वोट मिळविणारी स्पर्धक म्हणूनही शिल्पा समोर आली आहे. त्यामुळे प्रत्येकालाच असे वाटत आहे की, शिल्पाच या सीजनची विनर बनणार. परंतु तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, शिल्पा या शोची विनर बनणार नसल्याची माहिती आता समोर येत आहे.

वृत्तानुसार, शिल्पा बिग बॉसचा ताज कुठल्याही परिस्थिती जिंकू शकणार नाही. या आठवड्यात शिल्पा, हिना, लव आणि विकास नॉमिनेट झाले आहेत. मग शिल्पा या आठवड्यात घराबाहेर पडणार काय? नाही, बिग बॉसने शिल्पासाठी एक खूप मोठा गेम प्लॅन केला आहे. एका रिपोर्टनुसार, विकास गुप्ता शोचा विनर ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच व्हायरल झालेल्या एका ट्विटमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी अर्शीनेदेखील सांगितले होते की, विकासच शोचा विनर घोषित केला जाईल. मग अर्शीचे म्हणणे खरे ठरणार आहे काय?

दरम्यान, या ट्विटमध्ये लिहिले की, शिल्पा शिंदेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. बिग बॉसने शिल्पाला पराभूत करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण मुंबईच्या सट्टा बाजारात बिग बॉस विनरसाठी शिल्पावरून खूप मोठी बोली लावली जात आहे. त्यामुळे शिल्पा जर पराभूत झाली तर कंपनीला त्याचा जबरदस्त फायदा होणार आहे. याबाबतची माहिती त्या व्यक्तीने दिली जी बेटिंगमध्ये सहभागी आहे.

- Advertisement -

हे ट्विट कसे व्हायरल झाले हे अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र या ट्विटमध्ये बिग बॉसला टॅग केले आहे. दरम्यान, या आठवड्यात अभिनेत्री राणी मुखर्जी घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे सलमान राणीसोबत लव, हिना, शिल्पा आणि विकासपैकी कोणाला बाहेर काढतो. जर शिल्पाला त्याने बाहेर काढले तर हा एक मोठा गेम प्लान ठरेल, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.

- Advertisement -