जेव्हा बिपाशा बसूने जॉन अब्राहमला केली होती शिवीगाळ!

- Advertisement -

अभिनेत्री बिपाशा बसू २०१५ मध्ये आलेल्या अलोनया चित्रपटात झळकली होती. त्यानंतर जवळपास दोन वर्षे झाली, परंतु बिपाशा एकाही बॉलिवूडपटात झळकली नाही. बॉलिवूडमध्ये बिपाशाची एंट्री खूपच धमाकेदार राहिली. त्याचबरोबर ती तिच्या चित्रपटांमध्ये को-अ‍ॅक्टर्ससोबत असलेल्या अफेअरवरूनही चांगलीच चर्चेत राहिली.

सर्वात अगोदर तिचे नाव २००२ मध्ये आलेल्या ‘राज’ या चित्रपटातील तिचा सहकलाकार डिनो मोरिया याच्याशी जोडले गेले. डिनोचे करिअर सुरू होण्याअगोदरच संपण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले. परंतु बिपाशाने तिच्या करिअरला चांगलीच कलाटणी दिली. पुढे ती जॉन अब्राहमसोबत काही चित्रपटांमध्ये झळकली. त्याचबरोबर तिचे नावही जॉनसोबत जोडले गेले. त्याकाळी दोघांच्या अफेअरची चांगलीच चर्चाही रंगली. दोघे विवाहाच्या बंधनात अडकतील, असेच काहीसे चित्र दिसत होते. परंतु काही काळानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले. सध्या दोघेही वैवाहिक जीवन जगत असून, एकमेकांपासून दूर राहणे पसंत करतात. मात्र आम्ही या दोघांचा एक किस्सा आज तुम्हाला सांगणार आहोत.

जेव्हा बिपाशाचे आणि जॉन अब्राहमचे ब्रेकअप झाले तेव्हा बिपाशाचे नाव हरमन बावेजा आणि राणा दग्गुबाती या अभिनेत्यांबरोबर जोडले गेले. यामुळे ती सातत्याने चर्चेतही होती. मात्र ३० एप्रिल २०१६ मध्ये बिपाशाने अभिनेता करणसिंग ग्रोवर याच्याशी विवाह करून सर्व अफेअरच्या चर्चा कायमच्या बंद केल्या. करण आणि बिपाशाची भेट ‘अलोन’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तेथूनच तिने त्याच्यासोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आपला एक्स बॉयफ्रेंड जॉन अब्राहमलाही ती कायमची विसरली. जेव्हा एका मुलाखतीत बिपाशाला एक्स बॉयफ्रेंड जॉन अब्राहमशी तू मैत्री ठेवणार काय? असे विचारण्यात आले तेव्हा तिने जाहीरपणे त्याच्या नावाने शिवीगाळ केली.

- Advertisement -

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बिपाशाला जॉनबद्दल प्रश्न विचारताच ती प्रचंड संतापली होती. तिने त्याच्या नावाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिने शिवी देताना म्हटले की, जर तुमचा एक्स ०ङ्म०ङ्म असा असेल तर त्याच्यासोबत मैत्री ठेवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जर तुम्हाला काही कारणास्तव वेगळे व्हावे लागले तर तुम्ही आयुष्यभर एकमेकांशी मैत्री ठेवू शकता, असेही बिपाशाने म्हटले होते.

- Advertisement -